Notice: file_put_contents(): Write of 664 bytes failed with errno=28 No space left on device in /www/wwwroot/muzbon.net/system/url_helper.php on line 265
Anand Shinde - Majhya Jatich Jatich | Скачать MP3 бесплатно
Majhya Jatich Jatich

Majhya Jatich Jatich

Anand Shinde

Длительность: 6:42
Год: 1988
Скачать MP3

Текст песни

माझ्या जातीचं-जातीचं थोर नशीब जातीचं
माझ्या जातीचं-जातीचं थोर नशीब जातीचं
भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं
भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)

आठवता इतिहास येई ग्वाहीच बोलकी
येई ग्वाहीच बोलकी, नाही हालकी-पूलकी
आम्ही माणसं-माणसं जणू सोनिया सारखी
जणू सोनिया सारखी माणुसकिलाच पारखी
मुकी रडण गावकी, गावकी न म्हारंकी
गावकी न म्हारंकी होती आमुची मालकी
पिढ्या-पिढ्याचं दुखणं नव्हतं एकल्या रातीचं
नव्हतं एकल्या रातीचं, जाती रोगाच्या साथीचं
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)

एका भयाण रातीला ग्वाड सपानं पडलं
ग्वाड सपानं पडलं, मन त्यातच गढलं
काळनिजेला सारून तवा डोळ उघाडलं
तवा डोळ उघाडल, देवदर्शन घडलं
मानवतेच्या भीमदुता भीतीन भुताली झाडलं
जातीयतेच्या भूताला त्यान मातीत गाडलं
तळागळच्या मानसा तुला वरती काढलं
तुला वरती काढलं, तुझ वजन वाढलं
सुख दिन-दुबळ्याच होत भीमाच्या हातीचं
भीमामूळ ह्या जातीला बळ आलया हत्तीच
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)

भीम रस तोलावाचा, भीम कडाडकी इज
सनातण्याची भीमानं केली हरामच नीज
मोठ्या मनान राखाया हिंदू धर्माची ती गुज
लिवल "हिंदूकोड बिल" नाही झालं त्याचं चीज
भीम bomb hydrogen धुमधडाड आवाज
धुमधडाड आवाज गाजं सभा गोलमेज
गानं भीमाच्या किर्तीच सार जन हे गातीत
सारं जन हे गातीत पोट करून छातीचं
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)

भीम कोकणाची शान, भीम दख्खनाचा कणा
सांगे राज सियाजना छाती ठोकून पुन्हा-पुन्हा
"या देशाचा इतिहास भीमाविना सुना-सुना"
"देशी-परदेशी पाहुणा देई भीमाला वंदना"
बापू जाता तराजूत भीमा भारीच विद्वाणा
लिहून देशाची घटना दिला लोकशाहीचा दागिना
अरे, काळ्या काळपाच्या तुझ्या वाटोळ नीतीच
भीमासाठी तुझी का रं अशी गुत्थिही तोतीचं
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
माझ्या जातीचं-जातीचं थोर नशीब जातीचं
माझ्या जातीचं-जातीचं थोर नशीब जातीचं
भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं
भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)
(भीम १०० नंबरी सोनं महुच्या मातीचं)