Band Baja

Band Baja

Avinash - Vishwajeet

Длительность: 5:53
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

मेहेंदी रंगली ग गौर पुजली ग
शुभ मुहूर्ताची सनई वाजली ग
हिरव्या चुड्यात भरजरी शालूत
गोड गोजिरी हि नवरी सजली ग
नवरी सजली ग नवरी सजली ग
मुहूर्त वेळा आली लगबग लगबग झाली
उरात का ग थरथर आणि
गाली चढली लाली
उरात का ग थरथर आणि
गाली चढली लाली

सजली नटली लाजली
लेक लाडकी चालली
बँड बाजा वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
बँड बाजा वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई

चांदण राती झगमगता तारा
तुटताना दिसता अंबरात
मन म्हणते काही चुकले तर नाही
अन काहूर उठते अंतरात
कधी तू हळवी हळवी च्या पावलात

हिंदोळा आभाळावर जाता
क्षणभर हि भोवळ कसली येते
हाती दे हात तुझा ग आता
जोडुया जन्मभराचे नाते
चाल चालू सप्तपदी
सोडुनिया शंका सारी
आणीन मी सर्वसुखे
भरभरुनिया संसारी
अधीर जराशी का उरी
बँड बाजा वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
बँड बाजा वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई

आठवतो तोच हाथ चिमुकला
जणू सुखाचा स्पर्श कोवळा
सांगती सारे मोठी झाले
पण माझी तू लेक सानुली
आ निरोप देण्या गहिवरते मन
निरोप देण्या गहिवरते मन
नांद सुखे संसारी
नांद सुखे संसारी
जुळुनी येतील बंध हे
दोन जीवांच्या जीवनी

बँड बाजा वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
बँड बाजा वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
बँड बाजा वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई