Vitthal Mauli
Mahesh Kale
3:53खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगी जे हीन अति पतित जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म सदा जे आर्त अति विकळ सदा जे आर्त अति विकळ जयांना गांजिती सकळ तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म कुणा ना व्यर्थ शिणवावे कुणा ना व्यर्थ शिणवावे कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्ता बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म प्रभुची लेकरे सारी प्रभुची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म असे हे सार धर्माचे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थ प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म