Lakshmi Too Ya Navya Gharachi

Lakshmi Too Ya Navya Gharachi

Manik Varma

Длительность: 3:12
Год: 1960
Скачать MP3

Текст песни

नकोस नयनी भरू आसवे
नकोस नयनी भरू आसवे, देऊ नको हूंदके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके
झालीस गं लाडके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके
झालीस गं लाडके
तुझ्या पावली येईल आता
आनंदाची अमोल सरिता
तुझ्या पावली येईल आता
आनंदाची अमोल सरिता
घरकूल आमुचे प्रसन्नतेने होईल गं बोलके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके
झालीस गं लाडके
ईथे अंगणी किती नाचतील
तुझ्या स्मितासमा सुमने चंचल
ईथे अंगणी किती नाचतील
तुझ्या स्मितासमा सुमने चंचल
तुझ्याच वात्सल्यातून येतील या सदनी माणके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके
झालीस गं लाडके
नको बावरू मुली अशी तू
मनी न ठेवी कसला किंतू
नको बावरू मुली अशी तू
मनी न ठेवी कसला किंतू
तुझ्या गुणाची गंगा आम्हा पाहू दे कौतुके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके
झालीस गं लाडके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके
झालीस गं लाडके