Dhanya Mee Shabari Shrirama

Dhanya Mee Shabari Shrirama

Sudhir Phadke

Альбом: Geet Ramayan Vol 6
Длительность: 7:35
Год: 1965
Скачать MP3

Текст песни

सीता रावणाने पळवली आहे असा निश्चित सांगून पक्षी राज जाटायु ने देह ठेवला
त्याचा देहचा योग्य प्रकारे दहन करून रॅम लक्षमण फुडें निघाले
त्या नंतर कदंब नावाच्या एका महाभयानक रक्षा साशी गाठ पडली
तोह शीर्षहीन राक्षस वास्तवीक महातेजस्वी धनु पूत्र होता
तो राक्षसास त्यांना म्हणाला लक्ष्मणासह वर्तमान श्री राम या वनात येऊन जेव्हा तुझे हाथ तोडतील
तेवहा तू स्वर्गात जाशील असा मला इंद्राने सांगितले आहे
हे रामचंद्रा तू मला मार आणि जाळून टाक
माझी सीता कोना रावणाने पळून नेली आहे
त्याचा विषयी तू अगोदर सांध्यांत माहिती सांग अशी रामाने त्याला विनंती केली
तेवहा कबंद म्हणाला अगोदर माझा देह दहन कर मग सांगतो
शेवटी राम लक्ष्मणाने त्या काबंदा ला एका खड्यात नेहुन टाकला
आणि चिता पेटवून त्याला भडाग्नीही दिला तेवहा तो धूमरहित अग्नी सारखा पूणर जात होऊन बाहेर आला
त्याने किष्किंदा दिवढी सुग्रीव वाशी सख्यकार
म्हणझे तो तुला साहाय्य करेल तुझया पत्नीचा शोध हि लावील
असा रामाला सांगितलं आणि पुडील मार्ग ही दाखवला
पॅम्प्हा सरोवरा च्या पश्चिम तीरा वर पोहचलयावर
श्री रामांना शबरी चा आश्रम लागलं
ती महा तपस्विनी शबरी अवर्णीय उत्साह ने
श्री रामांना सामोरी अली आणि म्हणाली

धन्य मी शबरी श्रीरामा
लागलीं श्रीचरणें आश्रमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा
चित्रकुटा हे चरण लागतां
किती पावले मुनी मुक्तता
वृक्षतळिं या थांबा क्षणभर करा खुळीला क्षमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा

या चरणांच्या पूजेकरितां
नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता
पदप्रक्षालन करा विस्मरा प्रवासांतल्या श्रमां
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा

गुरुसेवेतच झिजलें जीवन
विलेपनार्थे त्याचे चंदन
रोमांचांचीं फुलें लहडलीं वठल्या देहद्रुमा
रोमांचांचीं फुलें लहडलीं वठल्या देहद्रुमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा

निजज्ञानाचे दीप चेतवुन
करितें अर्चन आत्मनिवेदन
अनंत माझ्या समोर आलें लेवुनिया नीलिमा
अनंत माझ्या समोर आलें लेवुनिया नीलिमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा

नैवेद्या पण काय देउं मी
प्रसाद म्हणुनी काय घेउं मी
आज चकोरा घरीं पातली भुकेजली पौर्णिमा
आज चकोरा-घरीं पातली भुकेजली पौर्णिमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा

सेवा देवा कंदमुळें हीं
पक्‍व मधुरशीं बदरिफळें हीं
वनवेलींनीं काय वाहणें
वनवेलींनीं काय वाहणें याविन कल्पद्रुमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा

क्षतें खगांचीं नव्हेत देवा,
मीच चाखिला स्वयें गोडवा
गोड तेवढीं पुढें ठेविलीं फसवा नच रक्तिमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा

कां सौमित्री शंकित दृष्टी
अभिमंत्रित तीं नव्हेत उष्टीं
या वदनीं तर नित्य नांदतो
या वदनीं तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा
धन्य मी शबरी श्रीरामा
लागलीं श्रीचरणें आश्रमा
लागलीं श्रीचरणें आश्रमा