Phite Andharache Jaale

Phite Andharache Jaale

Sudhir Phadke

Альбом: Laxmichi Paule
Длительность: 6:18
Год: 1981
Скачать MP3

Текст песни

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

दरीखोर्यातून वाहे ओ एक प्रकाश प्रकाश

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

रान जागे झाले सारे ओ पायवाटा जाग्या झाल्या

रान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या

सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या

ओ ओ एक अनोखे लावण्य आले भरास भरास

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

दव पिऊन नवेली झाली गवताची पाती

दव पिऊन नवेली झाली गवताची पाती

गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी

क्षणापुर्वीचे पालटे ओ जग उदास उदास

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख
झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख

चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक

सारे रोजचे तरी ही

सारे रोजचे तरी ही
नवा सुवास सुवास

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
झाले मोकळे आकाश