Mee Kashala Aarshat

Mee Kashala Aarshat

Swaranand - Usharang

Длительность: 3:12
Год: 2005
Скачать MP3

Текст песни

मी कशाला आरशात पाहू गं?
मी कशाला बंधनात राहू गं?
मीच माझ्या रुपाची राणी गं
मीच माझ्या रुपाची राणी गं
मी कशाला आरशात पाहू गं?
मी कशाला बंधनात राहू गं?
मीच माझ्या रुपाची राणी गं
मीच माझ्या रुपाची राणी गं

वारा भारी खट्याळ
असा वाहे झुळझुळ
उडवी बटा कशा
गं बाई, आवरू तरी कशा
वैरी, झोंबे असा अंगा
कशी साहू गं
मी कशाला आरशात पाहू गं?
मी कशाला बंधनात राहू गं?
मीच माझ्या रुपाची राणी गं
मीच माझ्या रुपाची राणी गं

झाडे-वेली जोडीने
बघतात निरखून
माझ्याकडे कशा
गं बाई, जीव हो वेडापिसा
वाटे, जावे तसे निघुनी
कशी जाऊ गं
मी कशाला आरशात पाहू गं?
मी कशाला बंधनात राहू गं?
मीच माझ्या रुपाची राणी गं
मीच माझ्या रुपाची राणी गं