Namami Shamishan
Religious India
5:25आरती साईबाबा सौख्यदातार जीवा चरणरजातला द्यावा दासां विसांवा भक्तां विसांवा आरती साईबाबा जाळुनियां अनंग स्वसवरुपीं राहे दंग मुमुक्षुजनां दावी निज डोळां श्री रंग डोळां श्री रंग आरती साईबाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव आरती साईबाबा तुमचें नाम ध्यातां हरे संसृतिव्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साईबाबा कलियुगीं अवतार सगुणब्रहम साचार अवतीर्ण झालसे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साईबाबा आठां दिवसां गुरुवारीं भक्त करिती वारी प्रभुपद पहावया भवभय निवारी भय निवारी आरती साईबाबा माझा निजद्रव्यठेवा तव चरणरजसेवा मागणें हेंचि आतां तुम्हां देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साईबाबा इच्छित दीन चातक निर्मल तोय निज सुख पाजावें माधवा या सांभाळ आपुली भाक आपुली भाक आरती साईबाबा आरती साईबाबा सौख्यदातार जीवा चरणरजातला द्यावा दासां विसांवा भक्तां विसांवा आरती साईबाबा आरती साईबाबा आरती साईबाबा