Pratham Namo Gautama
Shahir Vithal Umap & Chorus
3:08महामनस्वी महामानवा महामनस्वी महामानवा अगणित गुणगंभीरा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा चवदार तळ्याचे पाणी पेटून उठे चैतन्य तुज पूढती निष्प्रभ झाले वावदूक पंडित मन्य जयशाली दलित दलाचा तू सेनानायक धन्य पददलिता आधार दिला तू पददलिता आधार दिला तू धीर दिला रणधीरा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा विष जहरी अन्यायाचे पचविलेस आत्मबलाने दलितांच्या दुबळ्या माना केल्यास ताठ अभिमानें निर्दयासी लाजविले तू देऊन दयेची दाने समतेसाठी झुंजलासी रे समतेसाठी झुंजलासी रे अपराजित खंबीरा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा मन स्वतंत्र नाही ज्याचे तो मुक्त असूनही दास मन स्वतंत्र नाही ज्याचे जीवन मृत समजा खास हा मंत्र महामोलाचा तू दिलास या देशास हे प्रति बुद्धा अभिनव बुद्धा हे प्रति बुद्धा अभिनव बुद्धा नवयुग घटनाकारा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा