He Phool Tu Dilele

He Phool Tu Dilele

Arun Daate

Альбом: Shabda Maala
Длительность: 5:46
Год: 2021
Скачать MP3

Текст песни

हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
आहे फुलात काटा आहे फुलात काटा
तोही पसंत आहे
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
दु: खावरी मुलामा देऊन तू सुखाचा
दु: खावरी मुलामा देऊन तू सुखाचा
जे वाटतोस ते ते  जे वाटतोस ते ते
सारे पसंत आहे
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे

विरता जुने प्रहार पडती नवीन घाव
विरता जुने प्रहार पडती नवीन घाव
तक्रार सांगण्याला तक्रार सांगण्याला
कोठे उसंत आहे
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे

मी भोगल्या व्यथांना साक्षी कुणी कशाला
मी भोगल्या व्यथांना साक्षी कुणी कशाला
माझाच एक अश्रू  माझाच एक अश्रू
अजुनी जिवंत आहे
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे

कधि सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी
कधि सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी
श्रीमंत अक्षरांची श्रीमंत अक्षरांची
इतुकीच खंत आहे
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
आहे फुलात काटा आहे फुलात काटा
तोही पसंत आहे
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे