Shatada Prem Karave

Shatada Prem Karave

Arun Date

Длительность: 6:21
Год: 2011
Скачать MP3

Текст песни

या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे
या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
या जन्मावर

चंचल वारा या जलधारा
भिजली काळी माती
चंचल वारा या जलधारा
भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही
रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे
फुले लाजरी बघून कुणाचे
हळवे ओठ स्मराव

या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
या जन्मावर

रंगांचा उघडुनिया पंखा
सांज कुणी ही केली
रंगांचा उघडुनिया पंखा
सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती
नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे
सहा ऋतूंचे सहा सोहळे
येथे भान हरावे
या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
या जन्मावर

बाळाच्या चिमण्या ओठांतून
बाळाच्या चिमण्या ओठांतून
हाक बोबडी येते
बाळाच्या चिमण्या
ओठांतून हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे
जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठी
नदीच्या काठी सजणासाठी
गाणे गात झुरावे
या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
या जन्मावर

या ओठांनी चुंबून घेईन
हजारदा ही माती
या ओठांनी चुंबून घेईन
हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी
अनंत मरणे झेलून घ्यावी
इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती
इथल्या पिंपळ पानावरती
अवघे विश्र्व तरावे
या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे
या जन्मावर
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे