Gautam Buddhacha Sandesh

Gautam Buddhacha Sandesh

Krishna Shinde, Chorus

Альбом: Namaskar Buddhadeva
Длительность: 3:17
Год: 1983
Скачать MP3

Текст песни

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम् बुध्दस्स
गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे
गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे
बोध ज्ञानाचा ज्ञानाचा देऊ चला रे
गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे

दुःख पापे जिथे ऐसा नदीचा किनारा
मोह माया जिथे ऐसा हा जीवन पसारा
शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा
प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा
विश्व शांतीच्या समतेची धारा
शोध सत्याचा सत्याचा घेऊ चला रे
गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे

क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे
बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे
पंचशीलाच्या शब्दाची गाथा
बोध शुद्धीच्या तत्त्वाची गाथा
बौद्ध धम्माच्या संघाची गाथा
दिव्य मार्गाने मार्गाने जाऊ चला रे
गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे

जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात तरती
अहं ईर्षातले पापाच्या खाईत बुडती
हितशत्रुला प्रेमाने जिंका
लोभ मोहाला त्यागाने जिंका
द्वेष क्रोधा संयमाने जिंका
महिमा धम्माचा धम्माचा गाऊ चला रे
गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे
गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चला रे