Tuj Maagatho Mi Aatha (Ganpati Song)
Lata Mangeshkar
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत वरदायका गणेशा महदाशया सुरेशा वरदायका गणेशा महदाशया सुरेशा का वेध लाविसी तू हेरंब एकदंत रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत येसी जळातुनी तू कोणा कळे न हेतू येसी जळातुनी तू कोणा कळे न हेतू अजुनी भ्रमात सारे योगी मुनी महंत रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत