Abhang Maza Ektarivar

Abhang Maza Ektarivar

Manik Varma

Длительность: 2:59
Год: 1952
Скачать MP3

Текст песни

आ आ आ आ आ आ आ आ आ आ
अभंग माझा एकतारीवर गाई रूपडे तुझेच सुंदर
अभंग माझा एकतारीवर

तुझी पाऊले सान गोजिरी कुमकुम रंगांकित झालेली
तुझी पाऊले सान गोजिरी कुमकुम रंगांकित झालेली
उघड्या अंगा उटी केशरी श्रीपद लांछन तव वक्षावर
अभंग माझा एकतारीवर

वैजयंतीची काळी माळा आ आ आ आ आ आ
वैजयंतीची काळी माळा तुला शोभते रे गोपाळा तुला शोभते रे गोपाळा
स्वैर बांधिसी कटिला शेला हास्य सदाचे तुझ्या मुखावर
अभंग माझा एकतारीवर

शंख चक्र अन्‌ गदा घेउनी सदा उभा तू भक्त रक्षणी
शंख चक्र अन्‌ गदा घेउनी सदा उभा तू भक्त रक्षणी
पद्मविभूषण कमल हुंगुनी कमलफुलाहुन अससी कोमल
अभंग माझा एकतारीवर गाई रूपडे तुझेच सुंदर
अभंग माझा एकतारीवर