Kabirache Vinito Shele

Kabirache Vinito Shele

Manik Varma

Альбом: Dev Pavala
Длительность: 3:16
Год: 1950
Скачать MP3

Текст песни

कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी धागा जोडी
जानकीचा नाथ जानकीचा नाथ
राजा घनश्याम

कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
दास रामनामी रंगे राम होइ दास
एक एक धागा गुंते धागा गुंते
रूप ये पटास रूप ये पटास
राजा घनश्याम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
विणुन सर्व झाला शेला पूर्ण होइ काम
ठायि ठायि शेल्यावरती शेल्यावरती
दिसे रामनाम रामनाम रामनाम
दिसे रामनाम
गुप्त होई राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर
कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम