Vrundavanat Majhya Hi Tulas Dolate

Vrundavanat Majhya Hi Tulas Dolate

Manik Varma

Длительность: 3:18
Год: 1969
Скачать MP3

Текст песни

वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते
मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते पतिदेव पूजिते
मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते पतिदेव पूजिते
घरकूल सानुलेसे या दोन जीवितांचे
येथे सुखात नांदे हे राज्य वैभवाचे
घरकूल सानुलेसे या दोन जीवितांचे
येथे सुखात नांदे हे राज्य वैभवाचे
सखयास मी मनाचे हे फूल वाहते
मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते पतिदेव पूजिते

रघुनंद श्याम विष्णू त्यांच्यांत मी पहाते
सानंद प्रीतिगंगा त्यांच्या हृदी वहाते
रघुनंद श्याम विष्णू त्यांच्यांत मी पहाते
सानंद प्रीतिगंगा त्यांच्या हृदी वहाते
तृप्ती मनोरथांची त्यांच्यांत राहते
मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते पतिदेव पूजिते

गतजन्मीच्या तपाचे हे पुण्य ये फळाला
या एक भाबडीला राजा गुणी मिळाला
दोघांस ईश्वराशी मी सौख्य मागते
मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते पतिदेव पूजिते