Aaj Mee Dattaguru Pahile

Aaj Mee Dattaguru Pahile

R.N. Paradkar

Длительность: 3:18
Год: 2001
Скачать MP3

Текст песни

माझे पुण्य फळा आले
माझे पुण्य फळा आले
आज मी दत्तगुरु पाहिले
आज मी दत्तगुरु पाहिले

शंखचक्र करी विराजित ते
पद्म कमंडलू हाती शोभते
शंखचक्र करी विराजित ते
पद्म कमंडलू हाती शोभते
भस्मांकित तनु गोजिरवाणी
यतिवेषे सजले
आज मी दत्तगुरु पाहिले
आज मी दत्तगुरु पाहिले

गळा माळ ती हाती झोळी
गळा माळ ती हाती झोळी
मुखकमलाची दिव्य झळाळी
मुखकमलाची दिव्य झळाळी
स्वर्ग सुखाची भेट आज ही
धन्य जीवन झाले
आज मी दत्तगुरु पाहिले
आज मी दत्तगुरु पाहिले

दीनांचा गुरुराज दयाळू
भक्तासाठी होत कृपाळु
दीनांचा गुरुराज दयाळू
भक्तासाठी होत कृपाळु
जटाधारी परब्रम्ह सावळे
पाहुनी मन धाले
आज मी दत्तगुरु पाहिले
आज मी दत्तगुरु पाहिले
आज मी दत्तगुरु पाहिले
आज मी दत्तगुरु पाहिले
माझे पुण्य फळा आले
माझे पुण्य फळा आले
आज मी दत्तगुरु पाहिले
आज मी दत्तगुरु पाहिले