Gaulnino Javu Naka Bazari

Gaulnino Javu Naka Bazari

R N Paradkar

Длительность: 3:27
Год: 1988
Скачать MP3

Текст песни

दह्यादुधाची करितो चोरी नंदाचा हरी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
दह्यादुधाची करितो चोरी नंदाचा हरी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
गौळणिंनो जाउ नका बाजारी

नंदाघरचा कृष्ण सावळा
नंदाघरचा कृष्ण सावळा
वाट अडवुन उभा राहिला
वाट अडवुन उभा राहिला
गौळणिंना ग छळतो भारी खट्याळ गिरीधारी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
गौळणिंनो जाउ नका बाजारी

रोज त्याला हवेच ग लोणी
रोज त्याला हवेच ग लोणी
करी मागणी हात पकडुनी
करी मागणी हात पकडुनी
नकार देता शारंगपाणी करतो शिरजोरी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
गौळणिंनो जाउ नका बाजारी

पदराशी लगट ही करतो
पदराशी लगट ही करतो
दह्यादुधाचे घडे ग मागतो
दह्यादुधाचे घडे ग मागतो
खडे मारतो पळुनी जातो कृष्ण करी मस्करी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
दह्यादुधाची दह्यादुधाची
करितो चोरी नंदाचा हरी
गौळणिंनो जाउ नका बाजारी
गौळणिंनो जाउ नका बाजारी