Mala Datta Guru Disle

Mala Datta Guru Disle

Sadhana Sargam

Длительность: 3:16
Год: 2000
Скачать MP3

Текст песни

ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले

माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळूनि
माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळूनि

कृतज्ञतचे श्वान बिचारे पायावर झुकले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले

चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे

घुमटामधुनि ह्रदयपाखरू स्वानंदी फिरले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले

तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया

तुमच्या हाति माझ्या भवती औदुंबर वसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले