Sakhi Mand Jhalya Taarka

Sakhi Mand Jhalya Taarka

Sudhir Phadke

Длительность: 5:45
Год: 1981
Скачать MP3

Текст песни

सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का येशील का
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला
हा प्रहर अंतिम राहिला
त्या अर्थ तू देशील का देशील का
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा प्रेमगाणे छेडणारा
सूर तू होशील का होशील का
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का होशील का
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
थांबेल तोही पळभरी
पण सांग तू येशील का येशील का
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का येशील का
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका