Tuze Roop Chitti Raho
Sudhir Phadke
3:17आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव, माया, फळ रसाळ मिळते खाया तुजभवती वैभव, माया, फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने दरी, डोंगर, हिरवी राने दरी, डोंगर, हिरवी राने, जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा? सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा