Dubhangun Jata Jata

Dubhangun Jata Jata

Suresh Wadkar

Альбом: Dubhangun Jata Jata
Длительность: 5:32
Год: 1984
Скачать MP3

Текст песни

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिराचिरा जुळला माझा
चिराचिरा जुळला माझा आत दंग झालो
दुभंगून जाता जाता
मी अभंग झालो मी अभंग झालो

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
वळ न मोजलेले कशी कथा सरता सरता
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
मी अभंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो
मी मला मिळालो सर्व संग सुटले माझा
सर्व संग सुटले माझा मीच संग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
मी अभंग झालो

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी
निमित्तास टाळी
तरू काय  इंद्रायणिचा तरू काय  इंद्रायणिचा
मी तरंग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
मी अभंग झालो
चिराचिरा जुळला माझा
चिराचिरा जुळला माझा आत दंग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो