Chand Matla

Chand Matla

Swapnil Bandodkar

Альбом: Laal Ishq
Длительность: 4:57
Год: 2016
Скачать MP3

Текст песни

चांद मातला चांद मातला
जीव गुंतला जीव गुंतला
चांद मातला चांद मातला
जीव गुंतला जीव गुंतला
तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला जीव गुंतला
हो चांद मातला चांद मातला
जीव गुंतला जीव गुंतला

डोह सुखाचे भरून यावे
मोह कुणाचे टिपूर व्हावे
डोह सुखाचे भरून यावे
मोह कुणाचे टिपूर व्हावे
कापरापरी देह पेटला
कापरापरी देह पेटला
श्वास भारला अतीव माझा
देह धुक्याचा सैल मोकळा
जीव गुंतला जीव गुंतला
हो चांद मातला चांद मातला
जीव गुंतला जीव गुंतला
तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे

आत दिवे लाख पेटताना
रात भेटते दुरावताना
आत दिवे लाख पेटताना
रात भेटते दुरावताना
आपले दुवे शोधताना
आपले दुवे शोधताना
पार खोलवर रुजून ये ना
स्वैर वाहता काठ गाठला
जीव गुंतला जीव गुंतला
हो चांद मातला चांद मातला
जीव गुंतला जीव गुंतला
हो तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला जीव गुंतला
हो चांद मातला चांद मातला
जीव गुंतला जीव गुंतला