Ba Vitthala Dhav Pavre (From "Hari Om Vithala")
Suresh Wadkar
4:51Upagna Pandya, Seema Lele, Sagar Lele, Vijay Dhuri, Yogita Borate & Shantanu Herlekar
शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे संजीवन हो जनामनांचे रयतेच्या तारणहारा पावित्र्याच्या तेजा युगंधरांचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा सूर्यराज तू चंद्रराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू वायुगतीने वीरश्री तव कीर्तिभेदी क्षितिजा युगंधरांचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारू तू दीनांचा रे सहकारु संतांची अन गुणिजनांची करिशी तू पूजा युगंधरांचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा महाभारत घडले जेथे रामायण ते घडले तेथे शिवभारत तेथे घडते रामकृष्ण हि तुझी दैवते प्रतापदुर्गा तुळजा युगंधरांचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा