Deva Tujhya Gaabhaaryaalaa

Deva Tujhya Gaabhaaryaalaa

Adarsh Shinde, Kirti Killedar, & Anandi Joshi

Альбом: Duniyadari
Длительность: 4:26
Год: 2013
Скачать MP3

Текст песни

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी...
हे आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले
का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले
स्वप्न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
हे देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी...
का रे तडफड ही ह्या काळजा मधी
घुसमट तुझी रे होते का कधी
माणसाचा तू जल्म घे,
डाव जो मांडला मोडू दे
का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
हा का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी...
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी.
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू