Chandan Vrukshasaman Hota

Chandan Vrukshasaman Hota

Anil Kumar Khobragade

Длительность: 6:07
Год: 2010
Скачать MP3

Текст песни

चंदन वृक्षासमान होता भीमराव झिजला
चंदन वृक्षासमान होता भीमराव झिजला
जीवननौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला
दीपस्तंभ ठरला
चंदन वृक्षासमान होता

स्वानुभवाने दुःखे अमुची जाणूनिया घेतली
स्वानुभवाने दुःखे अमुची जाणूनिया घेतली
विद्रोहाची फुले तयाने करात आमुच्या दिली
संघटनेचा संघर्षाचा
संघटनेचा संघर्षाचा कानमंत्र हि दिला
जीवननौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला
दीपस्तंभ ठरला
चंदन वृक्षासमान होता

महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले
महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले
महाडात ते तळे तयाने बंधमुक्त करविले
वैषम्याच्या बुरुज तटाला
वैषम्याच्या बुरुज तटाला सुरुंग हि लाविला
जीवननौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला
दीपस्तंभ ठरला
चंदन वृक्षासमान होता

बहुजन हिताय बहुजन सुखाय घटना नव निर्मिली
बहुजन हिताय बहुजन सुखाय घटना नव निर्मिली
न्याय बंधुता समता नीती तत्त्वे प्रतिपादिली
स्त्री शुद्राच्या कल्याणाचा
स्त्री शुद्राच्या कल्याणाचा कायदाच घडविला
जीवननौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला
दीपस्तंभ ठरला
चंदन वृक्षासमान होता भीमराव झिजला
जीवननौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला
दीपस्तंभ ठरला
चंदन वृक्षासमान होता