Vate Vari
Swapnil Bandodkar
Ashok Patki, Rucha Bondre, & Pralhad Keshav Atre
भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसे बंधू शोभे नारायण द्रौपदीसे बंधू शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीशी बहीण विचाराया गेली नारद म्हणून बोट श्रीहरीचे कापले ग बाई बांधायला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शांदुणी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हासनी पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदीसे बंधू शोभे नारायण द्रौपदीसे बंधू शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानली बहीण परी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंधी फाडून देईल एवढे त्याचे माझ्यावरी ऋण वसने देऊन प्रभू राखी माझी लाज चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिली फाडून द्रौपदीसे बंधू शोभे नारायण द्रौपदीसे बंधू शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खून धान्य तोचि भाऊ धान्य ती बहीण प्रीती जी खरी ती जगाला भाविन प्रीती जी खरी ती जगाला भाविन चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसे बंधू शोभे नारायण द्रौपदीसे बंधू शोभे नारायण द्रौपदीसे बंधू शोभे नारायण