Hi Duniya Haay Ek Jatra

Hi Duniya Haay Ek Jatra

Jaywant Kulkarni

Альбом: Jotibacha Navas
Длительность: 6:43
Год: 1975
Скачать MP3

Текст песни

हो हो हो हो
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा
ह्या दुनियेला झुकवत न्हाई त्यो एक येडा भितरा
त्यो एक येडा भितरा ओ ओ
त्यो एक येडा भितरा
अर भिऊ नको न माग जाऊ नको
अर भिऊ नको न माग जाऊ नको
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा

नशिबाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी
कुनी धरली हातामधी समजंना दोरी
नशिबाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी
कुनी धरली हातामधी समजंना दोरी
घेरी येऊन वरडंल त्याला जलमाचा बसतोय हादरा
जलमाचा बसतोय हादरा ओ ओ
जलमाचा बसतोय हादरा
असं बर नव्ह अर बाबा करू नव्ह
हे असं बर नव्ह अर बाबा  करू नव्ह
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा

गरिबीचा शिनेमा बघा सोडुनी लाज
सुकासंग दुक्काची ऐका वाजतीया झांज
गरिबीचा शिनेमा बघा सोडुनी लाज
सुकासंग दुक्काची ऐका वाजतीया झांज
येडी आशा भावली होऊन उगाच दावतीया नखरा
उगाच दावतीया नखरा ओ ओ
उगाच दावतीया नखरा
असं वागू नको हं मागे लागू नको
हे असं वागू नको हं मागे लागू नको
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा

ह्यो फिरता घोडा नाव त्याचं व्यवहार
कुनी चोर असंल त्यो टांग टाकुनी स्वार
ह्यो फिरता घोडा नाव त्याचं व्यवहार
कुनी चोर असंल त्यो टांग टाकुनी स्वार
हितंच हाय परि दिसत न्हाई पोलिस मारतोय चकरा
पोलिस मारतोय चकरा ओ ओ
पोलिस मारतोय चकरा
हं तुला काय म्हणू नको जाळे विनू
हं तुला काय म्हणू नको जाळे विनू
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा

हे माणुसकीचं हाटेल बघतंय वाट
कुनी तिखाट भेटतोय हितं कुनी गुळमाट
हे माणुसकीचं हाटेल बघतंय वाट
कुनी तिखाट भेटतोय हितं कुनी गुळमाट
तुकड्यासाठी लाचार होऊन शेपुट हालवी कुतरा
शेपुट हालवी कुतरा ओ ओ
शेपुट हालवी कुतरा
लय भूकू नको डोळे झाकू नको
लय भूकू नको डोळे झाकू नको
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा

ह्या गर्दीमंदी इसर पडतो देवाचा
तोंडानं चालतो गजर नुसत्या नावाचा
ह्या गर्दीमंदी इसर पडतो देवाचा
तोंडानं चालतो गजर नुसत्या नावाचा
काळ्या पैशाची चांदी घेऊन देवळाला मारत्यात पतरा
देवळाला मारत्यात पतरा ओ ओ
देवळाला मारत्यात पतरा
कोणी काय म्हणा हं कोणी काय म्हणा
कोणी काय म्हणा हं कोणी काय म्हणा
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा
ही दुनिया हाय एक जतरा हौसं गवसं नवसं सतरा