Abir Gulal Udhalit Rang

Abir Gulal Udhalit Rang

Mahesh Hiremath

Длительность: 3:32
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग

उंबरठ्यासी  कैसे शिऊ आम्ही जातिहीन
उंबरठ्यासी  कैसे शिऊ आम्ही जातिहीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर गुलाल उधळीत रंग

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ
होऊनी निसंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग


आषाढी कार्तिकी भक्तजन येती
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती

चोख म्हणे नाम घेता
चोख म्हणे नाम घेता
भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग