Bhukela Bhaktila Bhagwan

Bhukela Bhaktila Bhagwan

R N Paradkar

Длительность: 3:10
Год: 1988
Скачать MP3

Текст песни

रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्‍नान
भुकेला भक्तीला भगवान
भुकेला भक्तीला भगवान
रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्‍नान
भुकेला भक्तीला भगवान
भुकेला भक्तीला भगवान

सेवून कण्या तो विदुराचा सौंगडी
त्या सुदाम्याचिया पोह्यांची आवडी
भावभक्तिचे तया आवडे एकच तुळसीपान
भुकेला भक्तीला भगवान
भुकेला भक्तीला भगवान

जो जेवु घालतो नामदेव विठ्ठला
दामाजीसाठी धेड हरी जाहला
जनी संगती दळितो त्याला भक्तांचा अभिमान
भुकेला भक्तीला भगवान
भुकेला भक्तीला भगवान

एकनाथा सदनी विठ्ठल भरितो घडे
तुकयाची भोळी भक्ती त्या आवडे
वारकर्‍यांसह नाचू लागे भजनातही भगवान
भुकेला भक्तीला भगवान
भुकेला भक्तीला भगवान
रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्‍नान
भुकेला भक्तीला भगवान
भुकेला भक्तीला भगवान