Janmale Shambhu Chhatrapati - Sambhaji Maharaj

Janmale Shambhu Chhatrapati - Sambhaji Maharaj

Rutuja Lad & Shantanu Herlekar

Длительность: 5:56
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

शिवशाहीचा भगवा फडके पुरंदरावरती
जन्मले शंभू छत्रपती
कळवा वार्ता गडागडावर हत्तीवरुनी वाटा साखर
उजळू द्या ते दिशा दिशांतर
उजळे अंबर आनंदाने पाहुनी ती दीप्ती
जन्मले शंभू छत्रपती
सईबाई ती राजस सुंदर मुधोजी कन्या ती फलटणकर
पोटी आला शिव कि भास्कर
मातृत्वाने धान्य जाहली सई ती शीलवती
जन्मले शंभू छत्रपती
पुत्र जाहला शिवरायाला पुत्र जाहला सह्याद्रीला
पुत्र जाहला फलटणपुरीला
मावळ मुलुखीं महोत्सवाची वाजे नौबत ती
जन्मले शंभू छत्रपती
धाड धाड ती तोफ तुफानी सांगे सर्वा गर्ज गर्जुनी
धर्मवीर तो पुन्हा जन्मुनी
शिवशाहीला फुटला अंकुर धन्य होय धरती
जन्मले शंभू छत्रपती