Shakakarte Shivaray - Chhatrapati Shivaji Maharaj
Upagna Pandya, Seema Lele, Sagar Lele, Vijay Dhuri, Yogita Borate & Shantanu Herlekar
5:43Sagar Lele, Vijay Dhuri & Shantanu Herlekar
जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत तेज तेज अन् तेज घेऊनि सौदामिनी ती लखलखली त्या चपलेचे तेज घेऊनि वीरश्री तव धगधगली त्या बिजलीचा लोळ दिसावा महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत मरणाला त्या मारून तुम्ही मोक्षाला गेला येथे ज्वलज्वलन अन तेजस राजे गौरविला गेला येथे मृत्युंजय हि काया झाली महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत अग्निशिखेला समोर जावे कसा करावा जंग सिद्दी फिरंगी इंग्रज ठाके अवाढव्य अवरंग झुंज झुंज अन झुंज दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत बाट रोखली हिंदूंची गनिमाची तुम्ही वाट रोखली शान राखली धर्माची शान राखली धर्माची धर्मवीर तुम्ही इथे जाहला महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत तख्त त्यागले क्षणभर शहाने तुमच्या तप्तच तेजाने काळाची मती कुंठित झाली तुमच्या दिव्यच दिप्तीने जीवन तुमचे कृतार्थ झाले महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत