Ranga Maliyela

Ranga Maliyela

Sharayu Date & Ketaki Mateygaonkar

Длительность: 5:16
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

रंग मालियेला श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला

सौभाग्याची मंगलघटिका
सौभाग्याची मंगलघटिका
आली आली गं
हळदी ल्याली
बाहुली माझी
मोठी झाली ग
सजणाची स्वारी थांबली ग दारी
सात जन्मासाठी बांधली ग दोरी
सात जन्मासाठी बांधली ग दोरी
आज मन्मनी तन्मणी हरखला ग
रंग मालियेला श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला
रंग मालियेला श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे आनंद गाणे

कोवळी माती सोवळे नाते
कोवळी माती सोवळे नाते
संसारचे फिरते जाते
क्षणी विहरते क्षणात अडते
अदमासाने पाऊल पडते
रीतभात हे सांगते
आ आ आ आ
रीतभात हे सांगते
प्रीत दूरच्या अंगणी नांदते ग
हात धरियेला हात धरियेला
भरतार केला सरस्वतीचा चेला
माथी घाली गं पुस्तक पाटी
माथी घाली गं पुस्तक पाटी

हो ओ चांदणं गोंदण आले भाळी
अल्लड भोळी नवीन भाळी
ओ दिस मासाची वर्षे झाली
केशर न्हाली मेंदी ओली
दिस मासाची वर्षे झाली
केशर न्हाली मेंदी ओली
अंग अंग हे बहरले ओ
अंग अंग हे बहरले ओ
आज दर्पणी हे कुणी वेगळी गं
रंग मालियेला श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला आनंद भारीयेला
रंग मालियेला श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे आनंद गाणे