Notice: file_put_contents(): Write of 685 bytes failed with errno=28 No space left on device in /www/wwwroot/muzbon.net/system/url_helper.php on line 265
Shravan Yashwante, Chorus - Navkotincha Raja | Скачать MP3 бесплатно
Navkotincha Raja

Navkotincha Raja

Shravan Yashwante, Chorus

Длительность: 2:52
Год: 1966
Скачать MP3

Текст песни

नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासम्बुद्धस्स
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि

राजा नवकोटीचा राजा
दयाळू दाता माझा
दयाळू दाता माझा आज पूजा गं
पूजा गं दयाळू दाता माझा आज पूजा गं

पोरं पिंपळपारावर
राजगृहापरी सुंदर
ध्यानस्थ आसनावर
बसविला भीमभास्कर
बसविला भीमभास्कर
दर्शनास नारी नर येतील गडे दिनभर
लगबगीनं तुम्ही जा जा
लगबगीनं तुम्ही जा जा जा पूजा गं
पूजा गं दयाळू दाता माझा आज पूजा गं

ज्याने रूढी बंधनातून
काढिले तुम्हा ओढून
आठवून तयाचे ऋण
व्हा मुक्त तुम्ही त्यातून
व्हा मुक्त तुम्ही त्यातून
गाऊन तयाचे गुण टाकावे गाव गर्जून
ही अशीच आरती गा जा
ही अशीच आरती गा जा जा पूजा गं
पूजा गं दयाळू दाता माझा आज पूजा गं

जावून स्मारकाकडे
जा पूजा पहा ती गडे
कशी रास फुलांची पडे
दरसाल पुण्य एवढे
दरसाल पुण्य एवढे
वर्षात दोनदा घडे जा रांग लावण्या पुढे
फुलहार घेऊनि ताजा
फुलहार घेऊनि ताजा जा पूजा गं
पूजा गं दयाळू दाता माझा आज पूजा गं
पूजा गं दयाळू दाता माझा आज पूजा गं