Makhmali (From "Zindagi Virat")

Makhmali (From "Zindagi Virat")

Sonu Nigam

Длительность: 5:06
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

तू पहाव मी हराव मन होई का बावरं
मी लपाव तू झुराव होई अस का बर
घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा
मखमली मखमली मखमली रेशमाचा तू आस
रेशमी रेशमी रेशमी बंध जुळला नवा

जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय पूरतं दंग
चुकला ठोका कसा काळजाचं गं धडधड वाढे संग
हे सपान पहाटेचं अधुऱ्याश्या भेटीचं
इशारा दे नजरेचा मला
हे मोगऱ्याची दरवळं श्वासातून घुटमळं
तुझ्यापायी झालो मी खुळा
घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा
मखमली मखमली मखमली रेशमाचा तू आस
रेशमी रेशमी रेशमी बंध जुळला नवा

जपलं सारं तुझ्या माझ्या पिरतीत उतरं गाली रंग
भिनलं वारं पुनवेच्या भरतीचं चढली न्यारी झिंग
हे तुझं रूप डोळ्यात तुझा श्वास श्वासात
तुझा हात हातात असा
हे उमलंल चांदनं अंगभर गोंदुन
फुलाचा शहारा हा नवा
घडलं कधी हे समजना काही
येई कसा ओंजळी चांदवा
मखमली मखमली मखमली रेशमाचा तू आस
रेशमी रेशमी रेशमी बंध जुळला नवा