Potapurta Pasa Pahije

Potapurta Pasa Pahije

Sudhir Phadke

Альбом: Prapanch Mar
Длительность: 3:10
Год: 1961
Скачать MP3

Текст песни

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी:
चोचीपुरता देवो दाणा माय माऊली काळी
हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी:
चोचीपुरता देवो दाणा माय माऊली काळी
एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जातन कराया काया
महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जातन कराया काया
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

सोसे तितके देई याहुनी हट्ट नसे ग माझा
हट्ट नसे ग माझा हट्ट नसे ग माझा  हट्ट नसे ग माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा
रंक करी वा राजा रंक करी वा राजा  रंक करी वा राजा
अपुरेपणही नलगे नलगे पस्तावाची पाळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी