Bajarangachi Kamal Hamal De Dhamal (From "Hamal De Dhamal")

Bajarangachi Kamal Hamal De Dhamal (From "Hamal De Dhamal")

Suresh Wadkar

Длительность: 4:02
Год: 2016
Скачать MP3

Текст песни

हे हे

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटा साठी
आटा पीटा कशासाठी
वित भर पोटासाठी
अरे बजरंगाची कमाल
हमाल दे धमाल
हमाल दे धमाल
हमाल धमाल हमाल धमाल
दूर सरा वाट करा संभाल

फलाटाला लगतीया इंजिन गाडी
आरं फलाटाला लगतीया इंजिन गाडी
तंबाकू ची पुडी टाका फेका बिडी काडी
आरं चला चला पटापटा बॅगाबिगा उचला
डोईवर सामानाचा डोंगर बरसला
तयार धंद्याला  करा हो हुकूम बंद्याला
हो बंदा
तयार धंद्याला करा हो हुकूम बंद्याला
हाणा उडी मारा धक्का
ओढा चला धरा पक्का
लावा ज़ोर सोडू नका
घामाचाच मिळे पैका
म्हातार्याचं आरं जरा ऐका
बोला बजरंगाची कमाल
हमाल दे धमाल
हमाल दे धमाल
हमाल धमाल  हमाल धमाल
दूर सरा  वाट करा संभाल

चार चौघात अपमान केला
असा तोऱ्यात निघून गेला
हा जसा मोठा राजा
मी वागीन तोडीस तोड
असा घेईन ह्याचा मी सूढ
हा असा राग माझा

आरं गावोगावी फिरा लेको मौजमजा करा
आरं गावोगावी फिरा लेको मौजमजा करा
तुम्ही हमालपूर्यात जगा आणि मरा
आरं हमालाला देऊ नये डोक्याला तरास
डोईवर बोझा तर पोटामध्ये घास
तयार धंद्याला करा हो हुकूम बंद्याला
हे बंदा
तयार धंद्याला करा हो हुकूम बंद्याला
नगा मागे हमालिची बोली होती अधिलीची
नोट दोन रुपयाची थट्टा आहे गरिबाची
ह्याच्या परी देऊ नका पईका
बोला बजरंगाची कमाल
हमाल दे धमाल
हमाल दे धमाल
हमाल धमाल हमाल धमाल
दूर सरा वाट करा संभाल

पुन्हा लावाल बॅगेला हाथ
ठेवा ध्यानात एकाच बात
माझ्या वाटेला गेलात कोणी
असा हानीन मागाल पाणी

आरं फलाटाला लगतीया इंजिन गाडी
आरं फलाटाला लगतीया इंजिन गाडी
तंबाकू ची पुडी टाका फेका बिडी काडी
आरं चला चला पटापटा बॅगाबिगा उचला
डोईवर सामानाचा डोंगर बरसला
तयार धंद्याला करा हो हुकूम बंद्याला हो बंदा
तयार धंद्याला करा हो हुकूम बंद्याला
हाथ लावा दादा थोड़ा
सामानाची चिंता सोडा
बस टैक्सी रिक्शा टांगा
कुठे जायचं लवकर सांगा
समजून द्या दादा पैका
बोला बजरंगाची कमाल
हमाल दे धमाल
हे हमाल दे धमाल
हमाल  धमाल हमाल धमाल
हमाल दे धमाल हे हमाल दे धमाल
हे हमाल दे धमाल हमाल दे धमाल