Aale Marathe Aale Marathe

Aale Marathe Aale Marathe

Devdutta Manisha Baji

Альбом: Subhedar
Длительность: 4:40
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

हे अंबाबाईचा उदो
आरे, अंबाबाईचा उदो
अंबाबाईचा उदो

हे रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा

हे आदि न अंत अशा शिवाचे
त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे
आम्ही नीळकंठ विष पिऊन
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून

चंडी ची ती प्यास मराठे
'दुर्गेचे' ते हास्य मराठे
वीजेला आडवा जाऊ नको रे
फाडून पल्याड जाती मराठे

रक्त अस्त्र वज्र ज्यांचे
वार घाव धन त्यांचे
ढाल तेगीची खण—खण—खण
मनी स्वराज्य दण—दण—दण

'शिवरायांची' आन मराठे
'जिजामातेचा' मान मराठे
तोडत जाती शत्रू सारा
भगवा छाताडात रोवी मराठे

आले मराठे आले मराठे
आदि न अंत अशा 'शिवाचे'
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून
पातशाही झोडती असे मराठे

उदो 'अंबाबाईचा'

रामच हा
कलियुगी 'शिवराय' रूपाने जो अवतरे आता
'कृष्णच' हा
गीतेचा अर्थ रेखितो तेजाळ तलवारे आता
भीमच हा
बळ ज्याचे
दळभारे
गजबळे
रणधुळे
रक्तजळे
वैरी पळे
धक्क धिंग
काळ हा मृत्युचा
रक्ताने माखला, रणात धावला
रुद्रसम, शक्ती हस्ते अहं पातुं वीरकृते
त्रिशूल: रक्तस्नानं अहं कर्तुं तत्परिते
अग्नयः अरीमुण्डं भस्मं कर्तुम् रक्षाकृते
शूलीजातः मस्तक खड्गच्छिन्नं कर्तुं धर्म हिते

शं शं शं शं शं शं शंकराय रक्त अर्पण
रं रं रं रं रं रं रणधीराय स्वेद अर्पण
हं हं हं हं हं हं हनुमताय प्राण अर्पण
कं कं कं कं कं कं कालिकाय मुण्ड अर्पण

नाद गुंजे दिगंबरा
डम—डम—डम—डम—डम—डम—डम—डम—डम

हे रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा

उदो अंबाबाईचा उदो
अंबाबाईचा