Dhyani Dhara Aika Jara

Dhyani Dhara Aika Jara

Pralhad Shinde

Длительность: 5:28
Год: 2021
Скачать MP3

Текст песни

ध्यानी धरा, ऐका जरा
विठुरायाचे चरण धरा
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

ए, ध्यानी धरा, ऐका जरा
विठुरायाचे चरण धरा
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

एकादशीला यात्रेसाठी
वारकऱ्यांची होते दाटी
एकादशीला यात्रेसाठी
वारकऱ्यांची होते दाटी

रमून जाती, तन्मय होती
देवाचे गुण गाती
(देवाचे गुण गाती)
(देवाचे गुण गाती)

सदैव हरिनामाचा तेथे
अखंड वाहे झरा
सदैव हरिनामाचा तेथे
अखंड वाहे झरा

ध्यानी धरा, ऐका जरा
विठुरायाचे चरण धरा
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

मातीची ही काया नश्वर
मातीला अंती मिळणार
मातीची ही काया नश्वर
मातीला अंती मिळणार

नाम प्रभूचे घेता सारे
संकट ते टळणार
(संकट ते टळणार)
(संकट ते टळणार)

पैलतीराला नेईल तुजला
जाण आता ईश्वरा
पैलतीराला नेईल तुजला
जाण आता ईश्वरा

ध्यानी धरा, ऐका जरा
विठुरायाचे चरण धरा
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

दिंड्या-पताका घेऊन हाती
भक्तीरसाला येई भरती
Hey, दिंड्या-पताका घेऊन हाती
भक्तीरसाला येई भरती

धुंद होऊनी तालावरती
"जय हरी विठ्ठल" म्हणती
("जय हरी विठ्ठल" म्हणती)
("जय हरी विठ्ठल" म्हणती)

याच देही डोळ्यानं पाही
रखुमाईच्या वरा
याच देही डोळ्यानं पाही
रखुमाईच्या वरा

ध्यानी धरा, ऐका जरा
विठुरायाचे चरण धरा
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

नित्य जपा रे आपल्या वाचे
नाम सदा त्या विठुरायाचे
नित्य जपा रे आपल्या वाचे
नाम सदा त्या विठुरायाचे

पावन व्हा रे, करून या रे
सार्थक या जीवनाचे
(सार्थक या जीवनाचे)
(सार्थक या जीवनाचे)

उद्धरुनिया नेईल तुम्हा
भक्ती मार्ग खरा
उद्धरुनिया नेईल तुम्हा
भक्ती मार्ग खरा

ध्यानी धरा, ऐका जरा
विठुरायाचे चरण धरा
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

ध्यानी धरा, ऐका जरा
विठुरायाचे चरण धरा
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)

(विठुरायाचे चरण धरा)
(विठुरायाचे चरण धरा)