Kaakan

Kaakan

Shankar Mahadevan

Длительность: 4:49
Год: 2015
Скачать MP3

Текст песни

जगण्याची आशा या मनाची भाषा
तू न बोलता न ऐकता समजून घे ना
स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
उजळे तुझ्या हसूने कण कण
अन्‌ चंद्र हे हातीचे काकण

भेटीला आणी तू नवी कहाणी माळून श्वासात ये
लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे
पहाट ओलेति तुझ्या उशाशी रातीला आवाज दे
येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची ही वेळ नको
ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
तू अशीच ये ना नि मिठीत घे ना
जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता
दे हातात हात जरी दूर वाट
भीती नाही आज तुझी संग साथ असताना
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
उजळे तुझ्या हसूने कण कण
अन्‌ चंद्र हे हातीचे काकण