Raja Sambhaji Title Track (From "Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Part 1") (Marathi)

Raja Sambhaji Title Track (From "Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Part 1") (Marathi)

Nandesh Umap

Скачать MP3

Текст песни

रणी भडकला नभी तळपला भगव्याचा अंगार

रणी भडकला नभी तळपला भगव्याचा अंगार
सवराज्याचा महारुद्र करी वैऱ्याचा संहार
शेर शिवबाचा र बाळ
मर्द मराठ्याचा जाळ
साऱ्या रयतेचा कैवार
ऐसा अवतरला मल्हार

राजं संभाजी र माझं
राजं संभाजी र माझं
शिव तांडवाची आग
आला सह्याद्रीचा वाघ
राजं संभाजी र माझं
राजं संभाजी र माझं
घालून कवडी माळ
आला जगदंबेचा बाळ

मान मराठा मातीचा अन् रयतेचा तो प्राण
पातशाहीचा काळ असे अन् भगव्याची तो शान
दरी-खोरं घाली साद, शंभू शंभू झाला नाद
देई मरणाला र मात, रुद्र मराठ्याची जात

राजं संभाजी र माझं
राजं संभाजी र माझं
शिव तांडवाची आग
आला सह्याद्रीचा वाघ
राजं संभाजी र माझं
राजं संभाजी र माझं
घालून कवडी माळ
आला जगदंबेचा बाळ

शूर हा नितीमंत
रुद्र हा कीर्तिवंत

शूर हा नितीमंत
रुद्र हा कीर्तिवंत
छावा शिवबाचा शोभला

धर्म दानवा मर्दून आला धर्माचा महावीर
उजळून गेला सह्याद्रीला मार्तंड अवतार
गड-कोटाचं गाऱ्हाणं व्हावं शंभूच हे ठाण
जैसा भैरावाचा भावं तैसी समशेरीची धार

राजं संभाजी र माझं
राजं संभाजी र माझं
शिव तांडवाची आग
आला सह्याद्रीचा वाघ
राजं संभाजी र माझं
राजं संभाजी र माझं
घालून कवडी माळ
आला जगदंबेचा बाळ