Vaat Pahe Shambhuraya (From "Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Part 1") (Marathi)

Vaat Pahe Shambhuraya (From "Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Part 1") (Marathi)

Shreya Ghoshal

Скачать MP3

Текст песни

शहारली मावळ माती
दिस किती गोड गं

शहारली मावळ माती
दिस किती गोड गं
मोहरल्या मनाला या
साजनाची ओढ गं
डोळ्याच्या या पणतीनं
दारापाशी ओवाळीनं
मनभर न्याहाळीनं
तेजवरा
मन माझं स्वप्नातं हरवूनी निजलं

हुरहुरलं रूणझुणलं
वाट पाहे शंभूराया
मन एकलं
हुरहुरलं ग बाई बावरल
वाट पाहे शंभूराया
मन एकलं

काजळल्या नभकडा
उगवला चंद्र धुंदसा

काजळल्या नभकडा
उगवला चंद्र धुंदसा
येशील अंगणात तू
लागे आस राजसा

मनरमणा
सख्यासजना सजना

मन माझं मोहुनी तुझ्यासाठी थिजलं

हुरहुरलं रूणझुणलं
वाट पाहे शंभूराया
मन एकलं
हुरहुरलं ग बाई बावरल
वाट पाहे शंभूराया
मन एकलं

पाहूनिया रणवीरा
श्रीराम भासले मला

पाहूनिया रणवीरा
श्रीराम भासले मला
रायरीस ओढ ही
तुझिया भेटीची आता

गड अवघा हा पहा
जणु नटला स्वागता

लाख लाख जखमांनी अंग आज सजलं (सजलं)

हुरहुरलं रूणझुणलं
वाट पाहे शंभूराया
मन एकलं
हुरहुरलं ग बाई बावरल
वाट पाहे शंभूराया
मन एकलं

मन एकलं मन एकलं