Breathless [Album - Breathless '98]
Shankar Mahadevan
3:03ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ह्या झिलमिल झिलमिल पाऊसधारा तन मन फुलवून जाती हो ह्या झिलमिल झिलमिल पाऊसधारा तन मन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती हा धुंद गार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे ला ला ला ला ला ला ला ला ओढ जागे राजसा रे अंतरी सुख बोले सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बघ आले लाट ही, वादळी, मोहुनी गाते ही मिठी लाडकी मोगरा होते पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे ए ला ला ला ला ला ला ला ला हे फुल ओले, पंख आले रूप हे सुखाचे, रोमरोमी जागले हे गीत मधुस्वप्नाचे बरसतो मोगरा थेंब गंधाचे भरजरी वेड हे ताल छंदाचे घन व्याकूळ रिमझिमणारा मन अंतर दरवळणारा ही स्वर्गमुखाची दारे, हे गीत प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे आ आ आ